Wed, Feb 20, 2019 02:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जिल्हा प्रशासनाच्या तहसिलदारांना सुचना ; टोल फ्री क्रमांकही जाहीर

आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पथके तयार ठेवा : जिल्हा प्रशासन

Published On: Jun 07 2018 7:11PM | Last Updated: Jun 07 2018 7:03PMनवी मुंबई : प्रतिनिधी 

हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीबाबतच्या इशा-यानुसार येत्या काही तासात कोकण-गोवा व मुंबई येथे दि 8 ते 12 जून या काळात  मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाप्रशासनाने मदतकार्यास तयार रहावे तसेच विविध पथके तयार ठेवावीत अशी सुचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तथा निवासी उप जिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाच्यावतीने १०७७ हा टोल फ्री क्रमांकही जाहीर करण्यात आला असून नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२२२५३०१७४० हा देण्यात आला आहे. 

यासंदर्भात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, आरोग्य विभाग यांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर बचावपथके, बोटी व बचाव साहित्य, पोहणाऱ्यांची यादी, संक्रमण शिबीरे, रूग्णवाहिका,औषधे इत्यादी सुविधा तत्पर व सतर्क ठेवण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत.

तसेच आपत्कालीन परिस्थितीत पंचनामा करण्या करीता,आपदग्रस्ताना मदत वाटपा करीता वेगवेगळी पथके  तयार करण्यात यावीत असे ही सूचित देखील करण्यात आले आहे. महत्वाचे अद्यावत दूरध्वनी क्रमांक तयार ठेवण्याच्या सुचना यावेळी करण्यात आल्या. तर, आपत्कालीन परिस्थितीत मनुष्यबळ कमी पडू नये म्हणून सर्व संबंधितानी मुख्यालय सोडू नये तसेच या कालावधीत कोणत्याही कर्मचाऱ्यांची रजा मंजूर करण्यात येऊ नये असेही निर्देश देण्यात आले आहेत.