होमपेज › Mumbai-Thane-Raigad › करंज पाणबुडीचे जलावतरण

करंज पाणबुडीचे जलावतरण

Published On: Feb 01 2018 1:36AM | Last Updated: Feb 01 2018 1:33AMमुंबई : प्रतिनिधी 

स्कॉर्पिअन श्रेणीतील तिसरी पाणबुडी करंजचे जलावतरण बुधवारी करण्यात आले. ही पाणबुडी लवकरच नौदलात  दाखल होणार आहे. या पाणबुडीची निर्मिती  माझगाव डॉक शिपबिल्डर्स येथे करण्यात आली असून पूर्णतः स्वदेशी बनावटीच्या या करंज पाणबुडीचे जलावरण झाल्याने नौदलाच्या सामर्थ्यामध्ये वाढ होणार आहे. 

मेक इन इंडिया मोहिमेतंर्गत तयार झालेली ही पाणबुडी प्रत्येक प्रकारातल्या युद्धास उपयुक्त ठरेल, या पध्दतीने तिचे डिझाईन बनवण्यात आले आहे. नौदल प्रमुख सुनील लांबा यांच्या प्रमुख उपस्थितीत करंज पाणबुडीचे जलावतरण करण्यात आले. 

आता, एक वर्षाच्या कालावधीत होणार्‍या विविध चाचण्यानंतर आयएनएस करंज पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात सामील होईल. या श्रेणीतील पहिली पाणबुडी कलवरी आणि दुसरी खंडेरी आहे. मेक इन इंडियाअंतर्गत एकूण  6 पाणबुड्या बनवण्यात येणार आहेत.