होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकशाही वाचवण्यासाठी संघाविरोधात एकत्र या

लोकशाही वाचवण्यासाठी संघाविरोधात एकत्र या

Published On: Dec 10 2017 1:20AM | Last Updated: Dec 10 2017 1:13AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

निरंकुश सत्तेमुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीच्या सत्ताधार्‍यांना या देशाच्या विकासाशी किंवा सर्वसामान्य जनतेला भेडसावणार्‍या प्रश्‍नांशी काहीच देणेघेणे राहिलेले नाही. या देशाचं संविधान आणि या देशातील लोकशाही वाचवायची असेल तर आरएसएस विरोधात सर्वांनी किमान समान कार्यक्रमावर एकत्र येऊन एक नवीन क्रांती घडवावी, असे आवाहन जेएनयूमधील विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार यांनी केले. 

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मुंबई कलेक्टिव या कार्यक्रमात तो बोलत होता. सध्या धर्मांधता विष बनली असून प्रत्येक गावात फूट पाडण्याचा प्रयत्न संघाकडून होत आहे. दंगली करण्यासाठी बाहेरचे लोक येत नाहीत. स्थानिकच दंगली करत आहेत. कालपर्यंत जे एकत्र क्रिकेट खेळत होते, तेच आता एकमेकांना पाकिस्तानधार्जिणे ठरवून हल्ले करत आहेत. मार्क्सवादी, आंबेडकरवादी आणि प्रगतीशील समतावादी विचारधारेच्या लोकांनी एकत्र येऊन प्रस्थापितांविरुद्ध आवाज उठविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांने सांगितले.