Thu, Apr 25, 2019 13:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तिन्ही आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी

तिन्ही आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी

Published On: Jan 22 2018 1:48AM | Last Updated: Jan 22 2018 1:11AMमुंबई  ः प्रतिनिधी

कमला मिल कंपाऊंड आगप्रकरणी शनिवारी अटक केलेल्या तिन्ही आरोपींना भोईवाड्यातील लोकल कोर्टाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  कमला मिलचा भागीदार रवी सुरजमल भंडारी, अग्निशमन दलाचे अधिकारी राजेंद्र बबन पाटील, वन अबव्ह व बिस्ट्रो मोजोस पबचा हुक्का सप्लायर उत्कर्ष विनोद पांडे या आरोपींना रविवारी दुपारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात कोर्टात हजर करण्यात आले.

आरोपींच्या वकिलांनी या आगीशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. मात्र, दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने या तिघांनाही 25 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आता अटक आरोपींची संख्या 11 झाली आहे.   या भीषण आगीत  चौदा जणांचा मृत्यू झाला होता. तर 30 हून अधिक लोक जखमी झाले होते. घटनेनंतर दोन्ही पबच्या मालकासह इतर आरोपींविरुद्ध ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यात आतापर्यंत लिस्बन स्टॅनली लोपीस, केवीन केनी बावा, युग कौशल पाठक, युग थुल्ली, विशाल रसीकलाल कारिया, क्रिपेश मनसुखलाल संघवी, जिगर मनसुखलाल संघवी,  अभिजीत अशोक मानकर या आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. अलिकडेच आयुक्त अजोय मेहता यांनी मुख्यमंत्र्यांना आगीसंदर्भात आपला अहवाल सादर केला होता. यात  काही आक्षेपार्ह बाबी नमूद करण्यात आल्या होत्या.