होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वन अबव्ह, मोजोसमध्ये हुक्का येत होता कुठून?

वन अबव्ह, मोजोसमध्ये हुक्का येत होता कुठून?

Published On: Jan 18 2018 1:57AM | Last Updated: Jan 18 2018 1:17AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो या दोन रेस्टोपबला लागलेल्या भीषण आगीप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी आता दोन्ही पबमध्ये येणार्‍या हुक्क्याच्या तस्करीचा तपास सुरू केला आहे. याच हुक्क्यामुळे आग लागून ही भीषण घटना घडली होती. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या पुण्याचे माजी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांचा मुलगा आणि मोजोस बिस्त्रोचा मालक युग पाठक याच्यासह वनअब्हवचे मालक क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांना भोईवाडा न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.

वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो या रेस्टोपबला 28 डिसेंबरच्या मध्यरात्री भीषण आग लागून 14 जणांच्या मृत्यू, तर 41 जण जखमी झाल्याप्रकरणी दाखल सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यामध्ये ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी संघवी बंधूसोबत त्यांचे व्यवस्थापक, तसेच पाठक आणि थुली यांच्याकडे कसून चौकशी केली. मात्र दोन्ही रेस्टोपबचे मालक एकमेकांवर बोटे दाखवत असल्याने पोलिसांच्या अडचणी वाढल्या होत्या. दरम्यान या चार आरोपींची पोलीस कोठडी संपत असल्याने पोलिसांनी त्यांना बुधवारी दुपारी भोईवाडा न्यायालयात हजर केले.