Fri, Jul 10, 2020 17:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कमला मिल दुर्घटना : रेस्टॉरंट व्यवस्थापकांना पोलिस कोठडी

कमला मिल दुर्घटना : रेस्टॉरंट व्यवस्थापकांना पोलिस कोठडी

Published On: Jan 01 2018 1:50PM | Last Updated: Jan 01 2018 5:08PM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

कमला मिल्‍स कम्‍पाऊंडमधील भीषण आगप्रकरणी 'वन अबोव्‍ह' पबच्‍या दोन व्‍यवस्‍थापकांना चौकशीकरिता काल रात्री पोलिसांनी अटक केली होती. आज भोईवाडा कोर्टात दौघांनाही हजर केले असता त्‍यांना ९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. केविन बावा आणि लिस्बन लोपेज अशी व्‍यवस्‍थापकांची नावे आहेत. 

दरम्‍यान, याच प्रकरणातील आरोपींना पळून जाण्‍यास मदत केल्‍याप्रकरणी महेंद्र कुमार सिंघवी यांच्‍यावर गुन्‍हा दाखल झाला होता. आज त्‍यांना जामीन मिळाला आहे. 

कमला मिल कम्पाऊंडमधील ट्रेड हाउस या इमारतीमधील मोजोस बिस्ट्रो आणि वन अबोव्‍ह या पब, रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी दि. २९ डिसेंबरच्‍या रात्री भीषण आग लागली होती. या दुर्देवी घटेत १४ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर बीएमसी प्रशासनाने कमला मिल परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. तसेच मुंबई महापालिकेने रविवारी सुटीच्या दिवशीदेखील धडक कारवाई करत दिवसभरात ६१६ हॉटेल्सची तपासणी केली. त्यामध्ये अनधिकृत बांधकाम केलेल्या ३५७ ठिकाणी कारवाई करण्यात आली. यावेळी ४२६ सिलिंडर जप्त करण्यात आले होते.