Fri, Mar 22, 2019 07:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कमला मिल आणखी तिघे अटकेत

कमला मिल आणखी तिघे अटकेत

Published On: Jan 21 2018 2:49AM | Last Updated: Jan 21 2018 2:00AMमुंबई : प्रतिनिधी

कमला मिल आगीप्रकरणी दाखल गुह्यामध्ये ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी कमला मिलचा संचालक आणि भागीदार रवी भंडारी याच्यासह मोजोस बिस्त्रो आणि वन अबव्ह या रेस्टो पबला हुक्का पुरविणार्‍या कंपनीचा मालक उत्कर्ष पांडे आणि अग्निशमन दलाचा अधिकारी राजेंद्र पाटील यांना शनिवारी रात्री अटक केली. तिन्ही आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग उघड झाल्याने पोलिसांनी ही करवाई केली आहे. तिन्ही आरोपींना रविवारी सुट्टी कालीन न्यायालयात हजर केले जाणार आहे.

कमला मिलच्या मालकानेच केले अनधिकृत बांधकाम?

दरम्यान, कमला मिल्सचे मालक रमेश गोवानी यांनी स्वत:च्या वरळी येथील राहत्या इमारतीच्या टेरसवर आणि बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केलेले असून या अवैध बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणी विश्‍वात्मक सामाजिक सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर स्वामी यांनी पालिका आयुक्‍तांकडे केली आहे.

चंद्रशेखर स्वामी यांच्या म्हणण्यानुसार, कमला मिलचे मालक राहत असलेल्या वरळीच्या चंद्रसागर इमारतीत 7 व्या मजल्यावर तळघरामध्ये आणि गाडी पार्किंग करण्याच्या जागेत बांधकाम केलेले आहे. तर टेरेसवर पार्टी हॉल बनवले आहेत.