होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कमला मिल प्रकरणी 'मोजोस बिस्त्रो''चा मालक अटकेत

कमला मिल प्रकरणी 'मोजोस बिस्त्रो''चा मालक अटकेत

Published On: Jan 16 2018 8:27AM | Last Updated: Jan 16 2018 8:30AM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

कमला मिल कंपाऊंडमधील भीषण आग्नितांडवप्रकरणी ‘मोजो बिस्ट्रो’चा मालक युगी तुली याला अटक करण्यात आली आहे.  'वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो' पबला २८ डिसेंबरच्या मध्यरात्री भीषण आग लागून १४ जणांचा मृत्यू झाला होता, तर ४१ जण जखमी झाले होते. या घटनेनंतर  युग तुली फरार होता. हैदराबादमधून त्याला अटक करण्यात आली आहे.

 यापूर्वी  या घटनेनंतर वन अबाव्‍हचे मालक क्रिपेश आणि भाऊ जिगर संघवी आणि त्यांचा सहकारी अभिजित मानकरला १२ दिवसानंतर अटक करण्यात आली होती.  ‘मोजो बिस्ट्रो'चा मालक युग तुली हैदराबादमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार हैदराबाद पोलिसांशी संपर्क साधून मुंबई पोलिसांनी त्याच्या अटकेची कारवाई केली.