होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काळाघोडा फेस्टिव्हल स्थगिती कायम

काळाघोडा फेस्टिव्हल स्थगिती कायम

Published On: Feb 06 2018 1:47AM | Last Updated: Feb 06 2018 1:14AMमुंबई : प्रतिनिधी

शहरातील प्रसिद्ध काळा घोडा कला महोत्सवांतर्गत चर्चगेट येथील क्रॉस मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने कायम ठेवली. आयोजकांतर्फे राज्य सरकारला फेस्टिव्हल संदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्यामुळे उद्या या प्रकरणाची सुनावणी ठेवण्यात यावी , अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आल्याने न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती पी.एन. देशमुख यांनी ही विनंती मान्य करून याचिकेची सुनावणी उद्या मंगळवार दि. 6 रोजी निश्‍चित केली.

दक्षिण मुंबईतील काळा घोडा परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित झाल्यानंतर काळा घोडा महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम काही वर्षापूर्वी चर्चगेटच्या क्रॉस मैदानावर घेतले जात होते. मात्र या मैदानावर कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी उच्च न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक असल्याने काळा घोडा महोत्सव आयोजकांनी न्यायालयाच्या परवानगीसाठी याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय जिल्हाधिकार्‍यांनी आयोजकांना कोणत्याही अटीविना विनाशुल्क वापरासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्‍त केली.