Thu, Aug 22, 2019 10:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केडीएमसीची महासभेच्या प्रवेशद्वारावर सेनेच्या दोघा नगरसेवकांच्या समर्थकांचा राडा 

केडीएमसीची महासभेच्या प्रवेशद्वारावर सेनेच्या दोघा नगरसेवकांच्या समर्थकांचा राडा 

Published On: Sep 10 2018 4:33PM | Last Updated: Sep 10 2018 4:32PMकल्याण : वार्ताहर 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची महासभा सुरु असताना सेनेच्याच दोन नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये तुंबळ राडा झाला. 

शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी महासभेत मांडलेल्या एका प्रस्तावावर सेनेच्याच पक्षाचे नगरसेवक रमेश म्हात्रे व जयेश म्हात्रे या दोघा मध्ये सभागृहात शाब्दिक खडाजंगी झाली. या शाब्दिक  खडाजंगीचे  पडसाद सभागृहाबाहेर देखील पडले. या दोघा नगरसेवकांचे  समर्थक महासभेच्या प्रवेश द्वाराजवळ एकमेकांना भिडले आणि शिवीगाळ करीत हमरीतुमरी  वर उतरून राडा घातला.