Thu, Jul 18, 2019 02:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण : डॉ.आनंदीबाई जोशी यांच्या स्मारकाबाबत केडीएमसीची उदासीनता

कल्याण : डॉ.आनंदीबाई जोशी यांच्या स्मारकाबाबत केडीएमसीची उदासीनता

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कल्याण : सतीश तांबे 

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या 153 व्या जयंती निमित्त गुगलने डुडल द्वारे स्मृतीस मानवंदना वाहून गुगलच्या होमपेजवर त्याचे डुडल प्रसिद्ध केले. मात्र दुसरीकडे दोन वर्षापूर्वी कल्याण मधील रुक्मिणी बाई हॉस्पिटल येथे स्व. डॉ.आनंदी बाई जोशी यांच्या स्मरणार्थ अर्धपुतळा उभारण्याच्या कामात उदासीनता असल्याचे दिसून येते. आनंदी बाई जोशी यांच्या पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचे हस्ते पार पडला होता. मात्र दोन वर्ष कालावधी लोटूनही स्मारकाच्या उभारणीचे काम तांत्रिक अडचणी मुळे प्रशासनाच्या लाल फितीत अडकल्याने डॉ.आनंदीबाई जोशी यांचे स्मारकाबाबत केडीएमसी प्रशासनामध्ये उदासीनता असल्याचे चित्र दिसून येत आहे.

आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. त्यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुणे येथे झाला. त्या नंतर काही  कल्याण परिसरातील पारनाका इथे त्यांचे वास्तव्य होते.गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या त्या ज्येष्ठ कन्या.वयाच्या नवव्या वर्षी बालपणातच त्यांचा विवाह गोपाळराव जोशी यांच्याशी झाला.भारतातील स्त्री डॉक्टरची किती गरज आहे हे ओळखून अठराव्या वर्षी १८८३ मध्ये आनंदीबाई डॉक्टरची पदवी घेण्या साठी अमेरिकेत गेल्या.११ मार्च १८८६  रोजी त्यांनी अमेरिकेच्या मेडिकल कॉलेज मधून डॉक्टरची पदवी मिळवत  भारतातील पहिली स्त्री डॉक्टर’ बनण्याचा मान मिळवला. 

आनंदीबाई जोशी यांची कल्याण गावाशी नाळ जुळली असल्याने कल्याण शहरात त्यांच्या स्मृतीं स्मरणात राहण्यासाठी त्यांचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी माजी शिक्षण समिती सदस्य अनिल काकडे व अन्य कल्याणकर नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे  तसेच  राज्य  शासन दरबारी केली. पालिका प्रशासनाने स्मारक उभारण्यासाठी तत्कालीन भाजपा नगसेविका व स्थायी समिती सदस्या डॉ.सुभा पाध्ये यांनी २०१३ मध्ये स्थायी समिती ठराव मंजूर करीत आनंदीबाई जोशी व सावित्री बाई फुले यांच्या पुतळा उभारणीसाठी प्रत्येकी पाच लाखाची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. या स्मारक ठरावाला महासभेत एक मताने मंजूर देण्यात आली होती.

मात्र, स्मारक उभारण्याच्या कामाला दोन वर्षाचा कालावधी लोटला तरी तांत्रिक अडचणी मुळे स्मारक  शासनाच्या लाल फितीत अडकून पडले आहे. यामुळेच पालिका प्रशासन व राज्य शासन या स्मारकाबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. याबाबत पालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याशी बातचित केली असता त्यांनी पुतळा उभारणीसाठी राज्य सरकारची एका समिती असल्याचे सांगितले. तर या समिती कडून व कला संचालनाकडून पुतळ्याच्या मॉडेलला अंतिम मान्यता मिळाली नसल्याचे सांगत, मान्यता मिळताच स्मारकातील पुतळा बनविण्याचे काम हाथी घेऊ असे सांगितले. 

डॉ.आनंदीबाई जोशी यांना मरणोत्तर 'भारतरत्न' किताबाने सन्मानित करावे 

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची आज एकशेत्रेपन्नावी जयंती. गुगलने आज डॉ.आनंदीबाई जोशींचे " डूड्ल् " प्रकाशित करून या महान विदुषीला आगळ्यावेगळ्या पध्दतीने आदरांजली अर्पण केली. Hats off to Goole! विशेष म्हणजे हे डूड्ल् बंगलोर स्थित प्रसिद्ध महिला चित्रकार कश्मिरा सरोद यांनी रेखाटलेले आहे. त्यांच्या मुखकमलावरचा अभिमान  प्रत्येक भारतीयाला निश्र्चितच अभिमानास्पद आहे. स्मृतीच्या गर्तेत गेलेल्या या महान स्त्रीला गुगलने खरोखरच जागतिक प्रसिध्दी दिली. डॉ.आनंदीबाईंना मरणोत्तर "भारतरत्न" अर्पण करून त्यांच्या कार्यकर्तृत्वा उचित गौरव करावा असे वाटते.  -  श्रीनिवास पुराणिक,  कल्याण
 

Tags : Anandi Gopal Joshi, memorial, KDMC, Kalyan, Kalyan news, 


  •