Wed, Nov 14, 2018 16:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › न्या. लोया मृत्यूचे राजकारण करण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री 

'न्या. लोया मृत्यूचे राजकारण करण्याचा प्रयत्न'

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी

न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या कुटुंबीयांना संशय नसताना त्यांच्या मृत्यूचा राजकीय लाभ उठविण्याचे प्रयत्न विरोधकांकडून केले जात आहेत. त्यांचा मृत्यूबाबत संशय निर्माण करणार्‍या बातम्या निराधार असून या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी पूर्ण झाली असून लवकरच निकाल लागून दूध का दूध पाणी का पाणी होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

विधानसभेत 293 अन्वये राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत विरोधकांकडून चर्चेचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या चर्चेत विरोधकांनी न्या. लोया यांचा मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.  हा मृत्यू हार्टअटॅकने झाला असतानाही कारावान साप्ताहिकाने चुकीची बातमी प्रसिध्द केली. त्यांच्या मुलाने वडीलांच्या मृत्यूचे राजकारण करू नका असे सांगूनही काही लोक त्यांच्या मृत्यूचे राजकारण करीत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.


  •