Mon, May 20, 2019 18:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आमदार जितेंद्र आव्हाडांनी केली मनसेची हंडी हायजॅक

आमदार आव्हाडांनी केली मनसेची हंडी हायजॅक

Published On: Sep 04 2018 8:05AM | Last Updated: Sep 04 2018 8:05AMठाणे : प्रतिनिधी 

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी दहीहंडीच्या उत्सवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या व्यासपीठावर हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या, पण गोविंदांच्या प्रेमापोटी मी येथे आलो असे सांगत आ. आव्हाडांच्या 2 तासांच्या उपस्थितीतीने गोविंदांवर गारूड केलेच, पण ही मनसेची हंडीही हायजॅक केल्याची चर्चा मनसैनिकांमध्येही काही काळ रंगली, त्यात या व्यासपीठावर पुढच्या वर्षी आमचा मुख्यमंत्री असेल, असे विधान करत आव्हांडांनी नंतर सारवासारवही केली, पण मनसेच्या हंडीत आ. आव्हाडांनी आपल्या हंडीच्या आठवणीही जागविल्या. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गेल्या 3 वर्षापासून दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. उच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवावर कडक निर्बंध लादल्याने नियमांच्या कचाट्यात हंडी अडकल्याने गेल्या 4 वर्षांपासून आमदार जितेंद्र आव्हाडांच्या संघर्ष सामाजिक संस्थेच्या वतीने दहीहंडीचे आयोजन केले जात नाही, त्यामुळे गेली 4 वर्षे मी हंडीच्या दिवशी बाहेर पडत नाही, 4 वर्षांनंतर मी हंडी दिवशी पहिल्यांदा बाहेर आल्याचे आमदार आव्हाड यांनी मनसेच्या व्यासपीठावर येताच स्पष्ट केले. दुपारी 4 च्या सुमारास आव्हाड भगवती शाळेच्या पटांगणात आले. हे व्यासपीठ हे पक्षातीत आहे. हा उत्सवही कोणत्याही पक्ष, जात - धर्म या पलीकडचा आहे, मी गोविदांच्या आठवणीने गेली 4 वर्षे व्याकुळ होतो, दहीहंडीवर अनेक संकटे आली, त्या संकटाच्या   काळातही मनसेच्या अविनाश जाधव या माझ्या मित्राने हंडी सुरू ठेवण्याचे साहस केले, त्यामुळे त्याचे कौतुक करायला, मी येथे आल्याचे आ. आव्हाड प्रारंभी म्हणाले.