Tue, Jul 16, 2019 01:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जिओतर्फे प्रीपेड ग्राहकांसाठी हॉलिडे हंगामा!

जिओतर्फे प्रीपेड ग्राहकांसाठी हॉलिडे हंगामा!

Published On: Jun 01 2018 8:12AM | Last Updated: Jun 01 2018 8:11AMमुंबई :  प्रतिनिधी

दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी जिओने पोस्ट ग्राहकांनंतर आता प्रीपेड ग्राहकांसाठीही हॉलिडे हंगामा ऑपर आणली आहे. यानुसार आता 399 रुपयांचा प्लॅन 299 रूपयांत मिळणार आहे. ही 100 टक्के सवलत तातडीने दिली जाणार आहे. अशाप्रकारच्या सवलतीचा लाभ फोन पेच्या माध्यमातून रक्‍कम अदा करणार्‍या ग्राहकांना मायजिओ अ‍ॅपच्या माध्यमातून घेता येईल. ही ऑफर 1 ते 15 जून दरम्यान लागू राहील.

जिओचा 399 रुपयांचा प्लॅन हा सर्वाधिक खप होणार प्लॅन आहे. या प्लॅनवर प्रीपेड ग्राहकांना दिली जाणारी सवलत दोन प्रकारची असेल. यानुसार मायजिओअ‍ॅपद्वारे जे प्रीपेड ग्राहक या प्लॅनसाठी रिचार्ज करतील, त्यांना 50 रुपयांचे कॅशबॅक वाउचर दिले जाणार आहे. तर उर्वरित 50 रुपयांची सवलत ही मायजिओ अ‍ॅपवर फोनपेद्वारे रक्‍कम अदा केल्यावर लगेच दिली जाणार आहे. अतिशय मर्यादित कालावधीसाठी 1 ते 15 जून दरम्यान ही योजना लागू राहील, अशी माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली.

सुट्यांचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. मात्र, तो लक्षात घेत जिओने हा प्लॅन आणला आहे. सुटीचे दिवस डिजिटल युगात अधिक आनंददायी होण्याकरता तसेच रिचार्जची सुविधा अधिक सुलभ होण्यासाठी जिओने हा प्लॅन लाखो प्रीपेड ग्राहकांसाठी देखील आणला आहे.

नव्या ऑफर व्यतिरिक्‍त सध्याचा अनलिमिटेड डाटा प्लॅन, ज्यात 1.5 जीबी डाटा प्रतिदिन दिला जातो, हा प्लॅन केवळ 100 रुपयांत उपलब्ध होणार आहे. तर 399 च्या प्लॅन जो आता 299 रुपयांत 100 रुपयांच्या सवलतीसह दिला जाणार आहे, तो प्रतिमहिना 100 रुपये याप्रमाणे 3 महिन्यांत विभागणी करण्यात आला आहे.