होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राष्ट्रमाता जिजाऊ यांची ४१८ वी जयंती साजरी

राष्ट्रमाता जिजाऊ यांची ४१८ वी जयंती साजरी

Published On: Jan 02 2018 11:12AM | Last Updated: Jan 02 2018 11:12AM

बुकमार्क करा
रायगड : प्रतिनिधी

राष्ट्रमाता जिजाऊंच्या ४१८ व्या जयंतीनिमित्त आज महाड शहरातील विविध शिवभक्त संघटनांतर्फे कोकणकडा मित्रमंडळाच्या विशेष पुढाकाराने झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रमाता  जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवभक्तांसमोर महापालिकेचे बांधकाम सभापती संदीप जाधव यांनी राष्ट्रमाता जिजाऊंच्या  हिंदवी स्वराज्‍य निर्मितीबाबत मत व्यक्‍त केले.  

ते म्‍हणाले, ‘‘जिजाऊंनी शिवरायांवर केलेल्‍या संस्कारामुळेच हिंदवी स्वराज्याची निर्मिती शक्य झाली. यावेळी नगरसेवक बंटी पोटफोडे यांच्यासह डॉ. चेतन सुवे यांनी मनोगते व्यक्त केली. कोकणकडा मंडळातर्फे गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त काळापासून राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती, पुण्यतिथी व राज्याभिषेक सोहळा तसेच छत्रपती शंभूराजे यांच्या जयंती  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी कोकणकडा मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांसह महाडकर नागरिक, पालिका लोकप्रतिनिधी मोठ्या संख्याने उपस्थित होते.