Fri, May 24, 2019 08:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › झा बंधू आत्महत्या : चौघांवर गुन्हे

झा बंधू आत्महत्या : चौघांवर गुन्हे

Published On: Jan 24 2018 1:53AM | Last Updated: Jan 24 2018 1:00AMविरार : वार्ताहर

विरार मधील झा बंधूंच्या आत्महत्येप्रकरणी चौघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यात माजी नगरसेवकाच्या मुलासह विरारच्या पोलीस अधिकार्‍याचा समावेश आहे.

पोलीस खोट्या गुन्ह्यात अडकवित आहेत, न्याय देत नाहीत असा आरोप करत विरार पूर्व येथील विकास झाने वसई उपविभागीय कार्यालयाबाहेर स्वत:ला जाळून घेतले होते. पोलिसांनी विकासला खोट्या गुन्ह्यात अडकविले. न्यायासाठी तो अनेकदा पोलिसांना भेटला पण त्यांनी त्याला न्याय दिला नाही. मुनाफ बलोच हाही विकासकडे पैशाची मागणी करत होता. या दोघांच्या त्रासाला कंटाळून विकासने आत्महत्या केल्याचा आरोप विकासचे वडील व भाऊ यांनी केला. याप्रकरणी स्थानिक पुढारी मुनाफ बलोच, पोलीस निरीक्षक युनूस शेख(विरार), अमरनाथ झा व निथिलेश झा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी ते मागणी करत होते. मुनाफ विरोधात गुन्हाही दाखल झाला होता.

 चौकशी सुरु आहे तुम्हाला न्याय मिळेल पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे व अप्पर पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी झा कुटुंबियांची भेट घेऊन सांगितले होते. तरीही अमित याने अर्नाळा परिसरात जाऊन विष प्राशन केले. त्याचा उपचारादरम्यान काल मृत्यू झाला. विकास आणि अमितच्या मृत्यूला पोलीस आणि मुनाफ  जबाबदार आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास मी ही आत्महत्या करेन असा इशारा मृत विकास, अमितच्या वडिलांनी दिल्यानंतर आज वरील चौघांवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस अधिक्षक सिंगे यांनी सांगिलते.