Sun, Dec 15, 2019 04:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जेट एअरवेज कर्मचाऱ्यांना न्याय कधी मिळणार? : धनंजय मुंडे

'जेट एअरवेज कर्मचाऱ्यांना न्याय कधी मिळणार?'

Published On: Jun 25 2019 1:41PM | Last Updated: Jun 25 2019 1:41PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

जेट एअरवेज रातोरात बंद पडतेच कशी? या निर्णयामुळे २२ हजार कर्मचारी बेरोजगारीच्या खाईत लोटले गेले आहेत. मार्च २०१९ पासून कर्मच्यारांचे वेतनही दिलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना न्याय कधी मिळणार? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे अधिवेशनात केला. 

यापुर्वी कर्जात बुडालेल्या जेट एअरवेजनं बँकांकडे ४०० कोटींची मदत मागितली होती. मात्र बँकांनी जेट एअरवेजला मदत नाकारली. परिणामी कंपनी बंद करण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहिला नाही. जेट एअरवेजची विमाने उड्डाण कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जेट एअरवेज संकटात सापडल्याने जेटच्या २२ हजार कर्मचार्‍यांच्या रोजगारावरही टांगती तलवार कायम आहे.

यापैकी काही कर्मचार्‍यांनी नुकतेच मुंबईत आंदोलनही केले होते. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी देश-विदेशात जाणार्‍या हजारो पर्यटकांनी आगाऊ बुकिंग केलेल्या तिकिटांचे करोडो रुपये अडकल्याने पर्यटकही गोंधळून गेले आहेत. या प्रश्नी आक्रमक होत मुंडे यांनी मुख्यमंत्री आणि कामगारमंत्री यांनी केंद्र शासनाकडे लवकर पाठपुरावा करून त्यावर तोडगा काढावा, अशी मागणी केली.