Thu, Aug 22, 2019 12:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कलाकारांना जगण्यापुरती पेन्शन द्या : जयंत सावरकर

कलाकारांना जगण्यापुरती पेन्शन द्या : जयंत सावरकर

Published On: Jun 14 2018 1:34AM | Last Updated: Jun 14 2018 1:14AMमुलुंड : प्रतिनिधी

शासनाकडून कलावंतांना 2100 रूपये पेन्शन मिळते. उतारवयात विशेषत 60 - 65 नंतर कलावंतांना औषधपाण्याचा खर्चही अपरिहार्यपणे  येतो, त्यामुळे कलावंतांना ही पेन्शन पुरत नाही. त्यामुळे सरकारने कलाकारांना (लिव्हिंग वेजेस) इतकी जगण्यापुरती पेन्शन द्यावी, अशी अपेक्षा 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष जयंत सावरकर यांनी केले. 

मुलुंड येथे सुरू झालेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात सावरकर यांनी मनोगत व्यक्त केले.  यावेळी सावरकर यांनी अध्यक्षपदाची सुत्रे 98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्या डोक्यावर पगडी घालून प्रदान केली. ना नियमीत पगार मिळत नाही, सुट्या नसतात त्यामुळे वैद्यकीय खर्च पेलण्याची ताकद सर्वच कलाकारांकडे नसते, त्यामुळे कलाकारांना जगण्यापुरती पेन्शन द्या, अशी मागणी सावरकर यांनी केली.

गेल्या दीड वर्षांच्या काळात केलेल्या काही कामाचा लेखाजोगा त्यांनी मांडला. या कामादरम्यान आलेले निष्कर्ष सावरकर यांनी मांडले. नाट्यगृहांची स्थिती सर्वत्र वाखणण्याजोगी नाही, याचा सावरकर यांनीही पुनरुच्चार केला. 

मनोरंजन ही ऊर्जा देणारी गोष्ट आहे. त्यामुळे ऊर्जा देणार्‍या या नाट्यगृहाची स्थिती बदलण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी अशा शहरात नाटके खुपे होतात, पण त्याच्या आजूबाजूला असलेल्या शहरवजा खेड्यांमध्येही कलाकार आहेत, अशा कलाकारांसाठी मान्यवर कलाकारांनी शिबिरे घेतल्यास नाटकाची चळवळ होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.