Sun, Mar 24, 2019 04:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जव्हारला पर्यटन दर्जा मिळवून देणार

जव्हारला पर्यटन दर्जा मिळवून देणार

Published On: Sep 07 2018 1:21AM | Last Updated: Sep 07 2018 1:11AMजव्हार : वार्ताहर

जव्हार संस्थानकाळाचा  ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जव्हार नगर परिषदेला 1 सप्टेंबर रोजी 100 वर्ष  पूर्ण झाली. यानिमित्त जव्हार नगर परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवाचे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी खडखड पाणीपुरवठा योजनेसह विविध 37 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जव्हारला पर्यटनाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी राजे महेंद्रसिंग मुकणे, पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, खासदार राजेंद्र गावित, कपिल पाटील, आमदार अमित घोडा, पास्कल धनारे, रवींद्र फाटक, महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष ज्योती ठाकरे, नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल, उपनगराध्यक्ष पद्मा रजपूत, नगरसेवक कृणाल उदावंत, रहिम लुलानिया, वैभव अभ्यंकर, मुख्याधिकारी प्रसाद बोरकर तसेच सर्व नगरसेवक आणि सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

खडखड धरणातून एकूण 17 कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी  तसेच 10 कोटी पर्यटन विकासासाठी 10 कोटी, तसेच अन्य कामांसाठी 37 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी तसेच शहराची हद्दवाढ समस्या दिवसेंदिवस जटील होत असल्यामुळे हद्दवाढीचा प्रस्ताव व्यवस्थित पाठवा, तो प्रस्तावही मंजुर करण्यात येईल. तसेच ब सत्ता प्रकारच्या जमिनींचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले. तसेच जव्हारला पर्यटन दर्जा मिळण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू, असे आश्‍वासन फडणवीस यांनी दिले. 

जव्हार शहरासाठी 850 एलईडी पथदिवे, टुरिझम वेबसाईट आणि कुपोषण मुक्तीसाठी पोषण अभियानासाठीची भित्तीपत्रके यांचे उद्घाटन व अनावरण यावेळी करण्यात आले. जव्हार सर्वोत्कृष्ट शहर होण्यासाठी जव्हारवासीयांनी प्रयत्न करावेत.त्यासाठी राज्य सरकारचे पूर्ण सहकार्य असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.  मुख्यमंत्र्यांचा सत्कार नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांनी केला, तर इतर मान्यवरांचे सत्कार सर्व नगरसेवकांनी केले. जव्हारचे अंतिम राजे यशवंतराम मुकणे यांचे नातू महेंद्रसिग मुकणे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाल व मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

उद्धव ठाकरेंनी का फिरवली पाठ?

जव्हार नगर परिषदेच्या या कार्यक्रमात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असतानाही तसेच जव्हार नगर परिषदेवर सेनेची सत्ता असतानाही ठाकरे यांनी या कार्यक्रमाकडे का पाठ फिरवली? या विषयाची चर्चा या कार्यक्रमानंतर रंगली. त्यामुळे सत्ता सेनेची असूनही फडणवीस यांच्या घोषणांनी येथील वातावरण भाजपमय झाल्याचे दिसून आले. याबाबत अनेक शिवसैनिकांनी आपली नाराजी खासगीत व्यक्त केली.