Sun, Apr 21, 2019 03:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाडमध्ये मतदार दिनानिमित्‍त जनजागृती रॅली(व्हिडिओ) 

महाडमध्ये मतदार दिनानिमित्‍त जनजागृती रॅली(व्हिडिओ) 

Published On: Jan 25 2018 10:59AM | Last Updated: Jan 25 2018 10:59AMमहाड: प्रतिनिधी

महाडमध्ये आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शहरातून कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थींनी जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन केले.  महाडचे प्रांताधिकारी श्रीलक्ष्मण इनामदार यांनी चवदार तळे येथील डॉ. आंबेडकर स्मारकाच्या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी व शासकीय कर्मचाऱ्यांना मतदान जागृतीदिना निमित शपथ दिली आणि फेरीसाठी झेंडा दाखवला. 

यावेळी महाडचे तहसीलदार चंद्रसेन पवार, नायब तहसिलदार प्रदीप कुडाळ यांसह डॉ. आंबेडकर कॉलेज महाड आयटीआय तसेच दगडूशेट पारटे विद्यालयातील  विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.