Mon, Nov 19, 2018 17:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जेएनपीटी आंदोलनाचा फटका हापूसला

जेएनपीटी आंदोलनाचा फटका हापूसला

Published On: May 11 2018 2:16AM | Last Updated: May 11 2018 1:44AMनवी मुंबई : राजेंद्र पाटील

केंद्र सरकारच्या डीपीडी धोरणामुळे जेएनपीटीतील स्थानिक वाहतूकदारांच्या व्यवसायावर संक्रांत येणार असल्याने स्थानिक वाहतूकदारांनी आक्रमक होऊन बुधवारपासून सुरु केलेल्या असहकार आंदोलनाचा फटका एपीएमसी निर्यातीला बसला आहे.हापुसची खरेदी ठप्प पडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून खरेदी थांबल्याने 7 कोटी रुपयांचा फटका घाऊक व्यापार्‍यांना बसल्याची माहिती व्यापारी संजय पानसरे यांनी दिली. 

या आंदोलनाबाबत व्यापारी संघटनेने केंद्रीय जल आणि रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांना माहिती दिली. हा संप मिटावा म्हणून शुक्रवारी सकाळी 9 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या सोबत एपीएमसी व्यापार्‍यांची बैठक होणार आहे. 

केंद्र सरकारच्या डीपीडी धोरणामुळे जेएनपीटीत आयात- निर्यात होणार माल थेट फॅक्टरीत पोहोचवला जात असल्याने येथील स्थानिक वाहतूकदारांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यातच जेएनपीटीने 1 मे पासून डीपीडी वाहतूक सुरू करून त्या करता 5 वाहतूकदारांना वाहतूकीचा ठेका दिल्याने स्थानिक वाहतूकदारांच्या व्यवसायावर गदा आली आहे. याविरोधात बुधवारपासून वाहतूकदार संघटनी अहसकार आंदोलन सुरु केले आहे. मात्र त्याचा फटका थेट व्यापार्‍यांना बसू लागला आहे.