Wed, Nov 21, 2018 21:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जेजे, सेंटजॉर्ज, जीटी, कामा रुग्णालये महागणार!

जेजे, सेंटजॉर्ज, जीटी, कामा रुग्णालये महागणार!

Published On: Dec 22 2017 1:28AM | Last Updated: Dec 22 2017 1:08AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

रोजच्या जीवनातील आवश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या असतानाच आता सरकारी रुग्णालयातील उपचारही महागणार असल्याने सामान्यांच्या खिशावर अधिकच भार पडणार आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयात मिळणार्‍या उपचारांच्या किमतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

शासकीय रुग्णालयांमध्ये उत्तम वैद्यकीय सुविधा, नाममात्र दरात मिळत असल्याने राज्याच्या कानाकोपर्‍यातून व राज्याबाहेरून देखील रुग्ण उपचारासाठी येत असतात. गेल्या आठ वर्षांत रुग्णालयातील दरात कोणतीही सुधारणा करण्यात आली नव्हती. उपचार शुल्क वाढवण्याचा निर्णय राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) घेतल्यामुळे जेजे, सेंटजॉर्ज, जीटी, कामा सारख्या शासकीय रुग्णालयात आता उपचार महागणार आहेत.