Fri, Jul 10, 2020 20:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › निसर्गच्या दणक्याने सलमानच्या फार्महाऊसचे नुकसान; कथित गर्लफ्रेंडने स्टेटसमधून दिली माहिती!

निसर्गच्या दणक्याने सलमानच्या फार्महाऊसचे नुकसान; कथित गर्लफ्रेंडने स्टेटसमधून दिली माहिती!

Last Updated: Jun 06 2020 10:16AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

 निसर्ग चक्रीवादळाने हाहाकार उडवल्याने सर्वांधिक फटका रायगड जिल्ह्याला बसला. कोकणातही निसर्गचा प्रकोप पाहायला मिळाला. वित्तहानीचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज पाहायला मिळाले. या चक्रीवादळाचा फटका अभिनेता सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाऊसला बसल. सलमानच्या या फार्महाऊसचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. 

निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या फार्महाऊस काही भागाचे फोटोज यूलिया वंतूरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यूलिया वंतूर लॉकडाऊन दरम्यान सलमान खानच्या फार्महाऊसवर वास्तव्यास आहे. काही फोटो आणि व्हिडिओ तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट स्टोरीवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये निसर्ग चक्रीवादळाने झालेले नुकसान स्पष्ट दिसत आहे. 

यूलिया वंतूरने जे फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले आहेत. त्यामध्ये जोरदार वारा, मुसळधार पाऊस, उन्मळून पडलेली झाडे आणि नुकसान पाहायला मिळत आहे. हे फोटोज निसर्ग चक्रीवादळ शांत झाल्यानंतरची आहेत. 

सलमान खान सध्या पनवेल येथील आपल्या फार्महाऊसवर फॅमिलीतील काही लोकांसबत राहत आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि यूलिया वंतूरदेखील आहे. सलमानने घरात बसून फार्म हाऊसच्या परिसरात आतापर्यंत दोन म्युझिक व्हिडिओज रिलीज केले आहेत.