Thu, Jan 24, 2019 16:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा कार्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवणे संतापजनक : चव्हाण

मराठा कार्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवणे संतापजनक : चव्हाण

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 12:44AMमुंबई : प्रतिनिधी

लाखोंचे मोर्चे कोणतीही अनूचित घटना न घडू देता शांततामय मार्गाने काढणार्‍या मराठा समाजातील संघटनांच्या कार्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. हे अतिशय संतापजनक असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. मराठा आंदोलकांनी संयम राखावा आणि शांततपूर्ण आंदोलनाचा मार्ग सोडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

वारकर्‍यांच्या गर्दीत साप सोडण्याचा विचार भिडेंची पिलावळ व त्यांना गुरू मानणार्‍यांच्याच डोक्यात येऊ शकतो. सरकारचा विरोध करणारे हे प्रत्येकवेळी गुन्हेगार ठरवले जात आहेत. शेतकर्‍यांनी मोर्चा काढला तर त्यांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न केला. एल्गार परिषदेच्या आयोजकांना माओवादी ठरवण्याचा प्रयत्न सरकारने केला. भीमा कोरेगाव दंगलीच्या खर्‍या सूत्रधारांना सोडून, आंदोलन करणार्‍या दलित बांधवांची माता-भगिनींसह धरपकड करण्यात आली. त्याच धर्तीवर मराठा समाजातील कार्यकर्त्यांना गुंतवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे चव्हाण म्हणाले.