Thu, Nov 15, 2018 11:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › न्यायालयीन आवारात इराणी कैद्यांचा गोंधळ; पोलिसांनाच दिली धकमी 

न्यायालयीन आवारात इराणी कैद्यांचा गोंधळ; पोलिसांनाच दिली धकमी 

Published On: Mar 15 2018 6:07PM | Last Updated: Mar 15 2018 6:07PMबिवली : वार्ताहर

कल्याणात न्यायाल्याच्या आवारात न्यायालयात हजर करण्यासाठी आणलेल्या कैद्यांनी गोंधळ माजवून कायदा, शांतता व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले. पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करणाऱ्या चौघा इराणी कैद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली. 

कल्याण-कसारा मार्गावर असलेल्या आंबिवली स्टेशनजवळ इराणी कबिला आहे. या कबिल्यातील बहुतांशी इराणी तरूण आणि त्यांच्या नातेवाईक महिलांचा चोऱ्या, लूटमार, हाणामाऱ्या, दंगल, यासारख्या गंभीर गुन्ह्यांशी संबंध आहे. अशा अनेक गुन्ह्यांत सहभाग असलेल्या इराणी कैद्यांनी गोंधळ माजवून कल्याण न्यायालयाच्या आवारात कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला. 

बुधवारी दुपारच्या सुमारास ठाणे पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले जे. बी. खताळ आपल्या सहकाऱ्यांसह एका गुन्ह्यातील आरोप फिरोज खान (45) त्याची आई बानू खान (55), अजगर अली हसन (32), त्याची पत्नी सालीया अजगर आली ठाकूर (30) या चार जणांना घेऊन कल्याण न्यायालयात हजर करण्याकरिता आणले होते. यावेळी या चार आरोपींनी कुरापत काढून पोलिसांशी हुज्जत घातली. तसेच पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी खताळ यांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी या चौघांना अटक केली.