Thu, Nov 15, 2018 12:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इक्बाल कासकर जे.जे. रुग्णालयात

इक्बाल कासकर जे.जे. रुग्णालयात

Published On: May 29 2018 2:14AM | Last Updated: May 29 2018 2:04AMठाणे : खास प्रतिनिधी

खंडणीप्रकरणी ठाणे मध्यवर्ती कारागृहात असलेला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याच्या छातीत  दुखायला लागले असून  पायालाही सूज आली आहे. त्याला सकाळी ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी कासकरला मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दुपारी दाखल करण्यात आले आहे.

खंडणीप्रकरणी इक्बाल कासकरसह त्याच्या साथीदारांना ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक केली होती. तेव्हापासून त्याला ठाणे कारागृहात ठेवण्यात आले आहे. सोमवारी छातीत दुखू लागल्याची तक्रार कासकरने कारागृह प्रशासनाकडे केली. डॉक्टरांनी तपासल्यानंतर  सकाळी साडे अकराच्या सुमारास त्याला कारागृहातून सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे हृदयरोग तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने त्याला जे.जे.त पाठविण्यात आले.