Thu, Jul 18, 2019 17:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इक्बाल कासकर पुन्हा पोलीस कोठडीत

इक्बाल कासकर पुन्हा पोलीस कोठडीत

Published On: May 14 2018 1:54AM | Last Updated: May 14 2018 1:04AMठाणे : वार्ताहर  

ठाण्यात खंडणीचे दोन गुन्हे उघडकीस आल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने मुंबईतून इक्बाल कासकर याला अटक केली. त्याच्या चौकशी दरम्यान आणखीन एका जमिनीच्या व्यवहार प्रकरणात खंडणीचे तिसरे प्रकरण समोर आले. तपास कामासाठी ठाणे पोलिसांनी न्यायालयीन कोठडीत असलेल्या इक्बाल कासकर याला पोलिसांनी पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतले. शनिवारी न्यायालयाने इक्बाल कासकरला  11 दिवसाची 21 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई एटीएस पथकाने नुकतेच एका टेररिस्टला अटक केली. परदेशात जाण्याचा मार्ग आणि कार्यपद्धती ही अटकेतील इक्बाल याच्याशी मिळती-जुळती असल्याने या दिशेनेही तपास  करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

ठाणे नगर पोलीस ठाणे आणि कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या आणि खंडणीपोटी प्लॅट घेण्यात आले होते. तर ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्वेलर्सकडून सोन्याचे दागिने खंडणीपोटी घेतल्याच्या तक्रारीनंतर ठाणे खंडणी विरोधी पथकाने मुंबईतून इक्बाल कासकर याला अटक केली. त्याच्या अधिक चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे तसेच दाऊद याच्याशी संपर्क याबाबत महत्वाची माहिती पोलिसांनी मिळवली होती. इक्बाल कासकर याच्या विरोधात खंडणी व्यतिरिक्त संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात अली होती.

त्यानंतर खंडणीचा तिसरा प्रकार उघडकीस आल्याने पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने त्याचा ताबा घेऊन चौकशीसाठी ठाणेनगर पोलीस ठाण्यात आणले. तिसर्‍या गुन्ह्यात आणलेल्या कासकरला न्यायालयाने 6 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर पुन्हा न्यायालयाने कासकरची रवानगी कारागृहात केली. दरम्यान इक्बाल कासकर याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा एकदा कासकरला खंडणी विरोधी पथकाने अधिक चौकशीसाठी आणले. त्याला न्यायालयात नेले असता न्यायालयाने तिसर्‍या खंडणीच्या गुन्ह्यातील तपासासाठी इक्बाल कासकरला 11 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तिसर्‍या गुन्ह्यात इक्बाल कासकर सोबत दाऊद इब्राहिम यांच्यावरही ठाण्यात प्रथमच गुन्हा दाखल करण्यात आला होता.