Fri, Apr 19, 2019 12:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घुसखोरांना मिळणार कायमचे घर

घुसखोरांना मिळणार कायमचे घर

Published On: Dec 06 2017 1:44AM | Last Updated: Dec 06 2017 1:01AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

मुंबई शहर व उपनगरांमध्ये दोन दशकाहून अधिक काळ राहणार्‍या साडेआठ हजार मूळ रहिवाशांसोबत अपात्र, अनधिकृत व घुसखोरी करणार्‍या रहिवाशांनीही मुंबईतच म्हाडाचे घर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. चाळी व इमारतींचा पुनर्विकास रखडल्याने शिबिरात राहणार्‍या मूळ रहिवाशांना मुंबईत घर देण्यात येणार आहे.

घुसखोरांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर देण्याचा प्रस्ताव असल्याचे सुत्रांनी सांगितले. विविध संक्रमण शिबिरांमध्ये सुमारे 8,448 घुसखोर, अपात्र आणि अनधिकृत गाळे धारक आहेत. यातील बहुतांश गाळेधारक गेल्या 20 ते 25 वर्षांपासून राहत आहेत. या गाळेधारकांनी वास्तवाचे विविध पुरावे तयार केले आहेत. यामुळे त्यांना गाळ्यांतून बाहेर काढण्यासाठी कायदेशीर अडचणी येत आहेत. हे सर्व गाळेधारक अनधीकृत असल्याने त्यांना जागा देण्याबाबत म्हाडाच्या नियमांत तरतूद नाही. मात्र मानवतेच्या दृष्टीकोनातून आणि म्हाडाच्या नियमांचे पालन करून दोन दशकांपेक्षा जास्त काळ संक्रमण शिबिरात राहणार्‍यांचा घराचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे सरकारने ठरवले आहे.