मुंबई : प्रकाश साबळे
राज्यात काही वर्षांपासून जातीय तेढ निर्माण करणार्या घटना घडत असताना, मुंबईतील वैदू समाजातील तरुणीने मात्र जातीय धुव्रीकरण करणार्यांना चांगलीच चपराक दिली. जोगेश्वरीत वास्तव्याला असलेल्या आणि वैदू जात पंचायतीचे चटके सहन केलेल्या दुर्गा गुडिलू यांची बहीण गोविंदू गुडिलू हिचा विवाह वांद्रे येथील बौद्ध समाजातील जयेश वाकडे यांच्याशी गुरुवारी पार पडणार आहे.
वर्षानुवर्षे या समाजामध्ये चालत आलेली बालविवाहाची प्रथा आता मागे पडली असून वैदू समाज आता बदलत्या काळानुसार बदलत असल्याचे या विवाहातून दिसून येते.
मुंबईतील वैदू समाजाच्या वस्तीमध्ये राहणारी गोविंदू ही सीप्झ कंपनीत आयटी क्षेत्रात काम करते. तिचे लग्न लहानपणीच तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलाशी ठरवण्यात आले होते. मात्र शिक्षणाचा गंध नसणार्या मुलाशी लग्न करणार नाही, हे तिने कुटुंबीयांना ठासून सांगितले. यानंतर तिने स्वत:चे शिक्षण पूर्ण केले. शिवाय समाजातील अनेक मुलींनाही शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. तिचा भावी पती जयेश वाकडे हा तरुण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता असून तोही एक प्रिंट व्यावसायिक आहे. यामुळे विरोध करणारे विरोध करतात, पण स्वत:ची वैचारिक इच्छाशक्ती पक्की असेल, तर आपल्या ठरलेल्या मार्गानेच पुढे जाता येते, असा विश्वास जयेशने व्यक्त केला.
May 06 2018 2:08AM
May 06 2018 2:08AM
May 06 2018 2:01AM
May 06 2018 2:00AM
May 06 2018 2:01AM
May 06 2018 2:01AM