Tue, Apr 23, 2019 13:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भीमा कोरेगाव प्रकरण : सुरक्षेसाठी इंटरनेट बंद

भीमा कोरेगाव प्रकरण : सुरक्षेसाठी इंटरनेट बंद

Published On: Jan 03 2018 2:37PM | Last Updated: Jan 03 2018 2:37PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

भीमा कोरेगांव प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. सोशल मिडियावरुन अफवा पसरवल्या जाण्याची शक्यता असल्याने अनेक शहरांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, खोटी माहिती पसरवली जाऊ नये म्हणून इंटरनेट बंद करण्यात आले आहे. 

भीमा कोरेगावप्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्रात बंदी हाक देण्यात आली होती. राज्यातील अनेक शहरांमध्ये आंदोलन करण्यात आले. यादरम्यान दगडफेक, जाळपोळीच्या घटनाही घडल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मिडियातून अफवा पसरवल्या जावू नयेत यासाठी दक्षता घेत इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.

अफवा पसरवू नका आणि विश्वास ठेवू नका
भीमा कोरेगाव प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.