होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडी तालुक्यात अधिकार्‍यांकडून पाहणी

भिवंडी तालुक्यात अधिकार्‍यांकडून पाहणी

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 14 2018 1:16AMठाणे : प्रतिनिधी

भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा गावातील विटभट्टीवर काम करणार्‍या आठ मजुरांना गॅस्ट्रोची लागण झाली होती. यात नयन निलेश मानकर या दोन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला. सात जणांना भिवंडीतील महात्मा गांधी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांसह घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेऊन रुग्णांची विचारपूस केली. 

रुग्णांना भिवंडीतील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे वृत्त समजताच ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस. सोनावणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चारुलता धानके यांच्यासह चिंबीपाडा येथील पाण्याच्या स्त्रोतांची पहाणी केली. विटभट्टीवर असलेल्या तीन विहिरींपैकी दोन विहिरीतील पाणी पिण्यासाठी न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

Tags : Mumbai, Inspecting, officials, Bhiwandi taluka