Thu, Aug 22, 2019 11:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दाभोलकर-पानसरे प्रकरणी अटक युवकांचा अमानुष छळ

दाभोलकर-पानसरे प्रकरणी अटक युवकांचा अमानुष छळ

Published On: Sep 12 2018 2:07AM | Last Updated: Sep 12 2018 1:36AMमुंबई : प्रतिनिधी

दाभोलकर-पानसरेप्रकरणी अटक केलेल्या हिंदु युवकांचा पोलीस कोठडीत अमानुष छळ होत आहे. त्यामुळे आरोपीं, संबंधित पोलीस अधिकारी व आरोपींच्या वकीलांची नार्को चाचणी करावी, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केली. 

हिंदु विधीज्ञ परिषदेने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुनाळेकर यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, 8 सप्टेंबरला केंद्रीय अन्वेषण विभागाचे अधीक्षक एस.आर्. सिंह यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याला तपासासाठी पुण्यात ठेवलेे आहे. 9 सप्टेंबर रोजी अटक केलेल्या आरोपींची हिंदू विधीज्ञ परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली होती. त्यावेळी त्यांचा छळ होत असल्याची माहिती मिळाल्याचे संजीव पुनाळेकर यांनी सांगितले.तसेच हिंदूंविषयी द्वेष पसरवणे, हिंदूंवर अत्याचार करणे आणि हिंदुत्वासाठी काम करणार्‍या निष्पाप युवकांना नाहक छळणे, असे कार्य हिंदुद्वेषी विचारसरणी बाळगणारे अधिकारी सत्ताधारी पक्षाच्या आड दडून करत आहेत, हे सत्य जनतेसमोर येईल, असेही पुनाळेकर यावेळी म्हणाले. 

राजेश बंगेरा, अमोल काळे, सचिन अंदुरे, डॉ. वीरेंद्र तावडे, शरद कळसकर यांच्या छळाबाबत तक्रारीची गंभीर दखल शासनाने त्वरित घ्यावी. तसेच संबंधित पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.