Sun, Jul 21, 2019 02:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इंद्राणी मुखर्जीची पतीला घटस्फोटाची नोटीस

इंद्राणी मुखर्जीची पतीला घटस्फोटाची नोटीस

Published On: Apr 28 2018 2:00AM | Last Updated: Apr 28 2018 1:18AMमुंबई : प्रतिनिधी

शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने याप्रकरणातील सहआरोपी असलेला आपला पती पीटर मुखर्जीला स्पीड पोस्टने घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. तिने पीटरकडून सहमतीने घटस्फोट देण्याची मागणी केली असून त्याच्या संपूर्ण संपत्तीतला अर्धा हिस्सा मागितला आहे. घटस्फोटाच्या या नोटीसमध्ये स्पेन आणि लंडनमधील संपत्ती, बँकेतील फिक्स डिपॉझिट्स आणि अन्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बँकांमधील गुंतवणूक यात विभागणी करण्याचा उल्लेख आहे.

पोटच्या मुलीचा खून करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप असलेली इंद्राणी मुखर्जी आणि तिचा पती पीटर मुखर्जी हे एकाच तुरुंगात आहेत. इंद्राणीच्या पोटच्या मुलीच्या हत्येत पीटरने तिची साथ दिली. मात्र आता इंद्राणीला पीटरची साथ नकोशी होऊ लागली आहे. आर्थर रोड तुरुंगात इंद्राणीपासून काही भिंतींच्या पलिकडील बराकीत कैद असलेल्या पीटरला इंद्राणीने स्पीड पोस्टने घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. तिने पीटरकडून सहमतीने घटस्फोट देण्याची मागणी केली असून त्याच्या संपूर्ण संपत्तीतला अर्धा हिस्सा मागितला आहे.

2015 मध्ये इंद्राणी मुखर्जी व पीटर मुखर्जी यांना शीना बोराच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते दोघेही आर्थर रोड तुरुंगात कैद आहेत. दोन वर्षात फारच कमी वेळा इंद्राणी पीटरशी बोलली आहे. याप्रकरणात इंद्राणीचा आधीचा नवरा संजीव खन्ना देखील आरोपी आहे. अनेकदा या तिघांना एकत्र न्यायालयात नेण्यात येते मात्र इंद्राणी कधीच यांच्यासोबत बोलत नाही. दरम्यान, पीटरच्या वकीलांनी मात्र अशी नोटीस अजून मिळाली नसल्याचे म्हटले आहे.

Tags : Mumbai, mumbai news, Indrani Mukherjee, husband, divorce notice,