Tue, Oct 22, 2019 01:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंब्य्र्रासह  दिवा, कळव्यात वीज वसुलीच्या  खासगीकरणाचे संकेत

मुंब्य्र्रासह  दिवा, कळव्यात वीज वसुलीच्या  खासगीकरणाचे संकेत

Published On: Dec 13 2017 2:37AM | Last Updated: Dec 13 2017 2:37AM

बुकमार्क करा

ठाणे : दिलीप शिंदे

वीज थकबाकीसाठी बदनाम झालेल्या मुंब्रा, कळवा आणि दिवा परिसरातील ग्राहकांनी तब्बल 346 कोटींची वीजबिले वर्षानुवर्षे थकविलेली आहेत. अशीच थकबाकी वाढत राहिल्यास भिवंडीप्रमाणे मुंब्रा, कळवा, दिव्यातील वीज वसुलीचे खासगीकरण होण्यास विलंब लागणार नाही. तसे संकेत ही वारंवार महावितरणकडून ग्राहकांना दिले जात आहेत. 

महावितरणच्या भांडुप क्षेत्रात भांडुप, मुलुंड, ठाणे, वागळे इस्टेटमधील औद्योगिक पट्टा, कळवा, मुंब्रा आणि दिवा या परिसराचा समावेश होता. आजमितीला भांडुप सर्कलमधील 2 लाख 42 हजार 397 ग्राहकांकडे 120 कोटी  423 कोटी रुपयांची चालू वीज थकबाकी असून ती वसूल करण्याची मोहीम सुरू आहे. या थकबाकीपैकी 71 कोटी रुपये फक्त मुंब्रा, कळवा आणि दिव्यामधील वीज ग्राहकांकडे आहे. उर्वरित थकबाकी ठाणे, वागळे इस्टेट, भांडुप, मुलुंडमधील आहे. 

फुकट आणि चोरीची वीज वापरण्याचा हा प्रकार असाच सुरू राहिल्यास मुंब्रा, कळवा, दिव्यामध्ये बिल वसुलीचे खासगीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीच थकबाकी भिवंडीत होती. प्रयत्न थकल्यानंतर खासगीकरणाचा निर्णय घेतला आणि टोरंटोसारख्या कंपनीकडे भिवंडीतील वसुली सोपविण्यात आली. या कंपनीकडून दररोज पाच ते सहा जणांवर वीज चोरीचे गुन्हे दाखल केले जात आहेत. या कडक कारवाईमुळे वीज गळतीचे प्रमाण कमी होऊन वसुलीतही लक्षणीय वाढ झाली. खासगीकरणाचा हा प्रयोग यशस्वी झाल्याने वीजचोरी आणि थकबाकीसाठी बदनाम असलेल्या मुंब्रा-कळवा, दिवाही खासगी कंपनीकडे सुपूर्द करण्याबाबत महावितरणाकडून गांभीर्याने विचार केला जात असल्याचे समजते.