Thu, Apr 25, 2019 17:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ओशोंच्या मृत्युपत्राची भारतातील प्रत बनावट

ओशोंच्या मृत्युपत्राची भारतातील प्रत बनावट

Published On: Jul 13 2018 8:06AM | Last Updated: Jul 13 2018 8:07AMमुंबई : प्रतिनिधी

आध्यात्मिक गुरु ओशो रजनीश यांच्या मृत्यूपत्राची  भारतात असलेली प्रत ही बनावट असल्याचा अहवाल दिल्ली फॉरेंसिक लॅबने दिला आहे. तर ओशो रजनिश यांच्या मृत्यूपत्राची मूळपत्र स्पेनसह जगात कुठेही उपलब्ध नसल्याचा दावा  पुणे पोलिसांच्या ईओडब्ल्यूने हायकोर्टात केला आहे. 

ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या विश्‍वस्तांनी ओशोंची बनावट सही करून ट्रस्टचा मोठ्या प्रमाणावर निधी आपल्या मालकीच्या खाजगी कंपन्यांच्या खात्यात वळवला, असा आरोप करत योगेश ठक्कर यांनी याचिका दाखल केली आहे़  त्या याचिकेवर न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणी न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे यांच्या यंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली.यावेळी पुणे पोलीसांच्या ईओडब्ल्यू शाखेने तपासाचा अहवाल सादर केला. ओशोच्या मृत्यूपत्राची मूळपत्र जगात कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे निव्वळ झेरॉक्स कॉपीवरून ओशो रजनिश यांची सही खरी की खोटी याची पडताळणी करणं कठीण असल्याचं  माहिती सरकारी वकिलांनी  न्यायालयात दिली. यावेळी न्यायालयाने पोलीसांच्या अहवालावर तिव्र नाराजी व्यक्त करून .एखाद्या खाजगी कंपनीत देतात तसा वार्षिक अहवाल सादर करू नका. या शब्दांत तपास अधिका-यांची कानउघडणी  करून  दिल्ली फॉरेन्सिक लॅबच्या अहवालावर भूमीका स्पष्ट करा असे निर्देष दिले.