Sat, Nov 17, 2018 02:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विरारमधील भारतीय कमांडर चीन सीमेवर शहीद

विरारमधील भारतीय कमांडर चीन सीमेवर शहीद

Published On: Jan 02 2018 2:03AM | Last Updated: Jan 02 2018 1:59AM

बुकमार्क करा
विरार : वार्ताहर  

विरारचे रहिवासी आणि गुहागर तालुक्यातील सुपुत्र कमांडर मेजर प्रसाद गणेश महाडिक हे 31 डिसेंबरच्या रात्री चीनच्या सीमेवर शहीद झाले. विरार पश्चिमेकडील यशवंत सोसायटीत राहणारे महाडिक हे गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावचे सुपुत्र होते. सन 2010 पासून ते चीनच्या सीमेवर दारुगोळा चेक करण्याचे काम करीत होते. 31 डिसेंबरलाही नेहमीप्रमाणे दारुगोळा चेक करण्यासाठी गेले असता, अचानक स्फोट झाला, त्यात ते शहीद झाले. त्यांचे पार्थिव 2 जानेवारीला सकाळी विरारच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे.