Sat, Jul 20, 2019 14:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईकर पृथ्वी शॉ, हनुमा विहारीचे कसोटीत पदार्पण; मुरली विजयला वगळले 

मुंबईकर पृथ्वी शॉ, हनुमा विहारीचे कसोटीत पदार्पण; मुरली विजयला वगळले 

Published On: Aug 22 2018 10:57PM | Last Updated: Aug 22 2018 10:57PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. सलामीवीर मुरली विजयला वगळण्यात आले आहे. १९ वर्षाखालील भारतीय विश्वकरंडक विजेत्या संघाचा कर्णधार पृथ्वी शॉला कसोदी पदार्पणाची संधी मिळाली आहे. त्याचबरोबर मधल्या फळीतील युवा फलंदाज हनुमा विहारीला सुद्धा स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, चायनामॅन कुलदीप यादवला तीन कसोटीनंतर वगळण्यात आले आहे, तर पहिल्या दोन कसोटीमध्ये मुरली विजयला संधी मिळाली होती. 

भारतीय संघ पुढीलप्रमाणे (उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी) 
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), करुण नायर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक),  आर. आश्विन, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रित बुमराह, शार्दुल ठाकूर, हनुमा विहारी