Tue, Jul 16, 2019 10:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्धव, आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ

उद्धव, आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ

Published On: Apr 15 2018 1:28AM | Last Updated: Apr 15 2018 1:28AMमुंबई : वार्ताहर

केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून आलेल्या एका अहवालानंतर गृहमंत्रालयाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सुरक्षा झेडवरून झेड प्लस, तर युवासेनाप्रमुख  आदित्य ठाकरे यांची सुरक्षा एक्सवरून वाय प्लस करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.

उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ स्कॉर्पिओ कारसोबत मुंबई पोलीस दलातील एक अधिकारी आणि चार अंमलदार तैनात ठेवण्यात येणार आहेत. दर सहा महिन्यांनी  व्हीआयपींच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येतो व त्यांच्या सुरक्षेत वाढ किंवा सुरक्षा कमी करण्यात येत असल्याचे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

Tags : Mumbai, Uddhav, Aditya Thackeray, Increasing security, Mumbai new