Tue, Apr 23, 2019 09:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोककलावंत, साहित्यिकांचे मानधन वाढवाः नंदेश उमप

लोककलावंत, साहित्यिकांचे मानधन वाढवाः नंदेश उमप

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 07 2018 12:46AMमुंबई : प्रतिनिधी

लोककलावंतांच्या आणि साहित्यिकांना मानधनात वाढ व्हावी, अशी मागणी गायक आणि लोककलावंत नंदेश उमप यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे पत्राद्वारे केली आहे. लोकशाहीर विठ्ठल उमप यांना लोककलेच्या इतिहासात मानाचे स्थान आहे.  विठ्ठल उमप यांनी त्यांच्या हयातीत अनेक गरजू लोककलावंतांना सढळ हाताने मदत केली. लोककलावंतांचे मानधन वाढवण्यासाठी त्यांनी  अनेकवेळा पाठपुरावा केला.  

लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या 88 व्या जयंतीच्या औचित्याने  लोककलावंतांच्या मानधनात दीड ते दोन हजारांनी वाढ व्हावी, अशी मागणी उमप यांनी राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक  संजीव पलांडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राज्यभरातील लोककलावंतांना आणि साहित्यिकांना राज्य सरकारकडून ठराविक मानधन दिले जाते. त्यासाठी लोककलावंत राज्य सरकारकडे अर्ज करतात. लोककलावंतांना मिळणारे मानधन तुटपुंजे आहे. त्यात वाढ करण्याची गरज आहे. यासंबंधीचा पत्रव्यवहार सरकारकडे करण्यात आला आहे.