मुंबई मनपाच्या कंत्राटदारांवर आयकरचे छापे

Last Updated: Nov 15 2019 9:14AM
Responsive image


मुंबई : प्रतिनिधी 

महाराष्ट्रात सध्या हाय व्होल्टेज राजकीय नाट्य सुरू आहे. अशातच आयकर विभागाने शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या दोन ठेकेदारांवर कारवाई केली आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी काम करणाऱ्या तीन व्यावसायिक समुहांवरही छापे टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. आतापर्यंत बोगस खर्च आणि भांडवली शेअर्सच्या प्रीमियमद्वारे भांडवली हस्तांतरणाच्या स्वरूपात २७५ कोटी रूपयांपेक्षा अधिक तफावत असल्याची माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते. राज्यात सध्या राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. भाजप आणि शिवसेनेमधूल मतभेद वाढत असतानाच हे छापे टाकण्यात आले आहेत. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत आयकर विभागाद्वारे छापे टाकण्याचे काम सुरू होते. दरम्यान, ही रक्कम ३०० कोटी रूपयांच्या जवळपास जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या टाकण्यात आलेल्या छाप्यांना काहीजण राजकीय रंगही देऊ शकतात. यासाठीच आय-टी विभागाने आपला मुद्दा प्रस्थापित करण्यासाठी कसून प्रयत्न केले असल्याचे समजते. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये 275 कोटी रूपयांपेक्षा अधिक तफावत असल्याचं समोर आलं आहे