Tue, Jul 23, 2019 11:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबई महापालिकेवर आयकर विभागाचा छापा

नवी मुंबई महापालिकेवर आयकर विभागाचा छापा

Published On: Jan 10 2018 3:48PM | Last Updated: Jan 10 2018 4:16PM

बुकमार्क करा
 नवी मुंबई:प्रतिनिधी 

जीएसटी बाबत आयकर विभागाच्या 12 अधिकाऱ्यांनी मंगळवारी  सकाळी महापालिकेच्या अकाउंट्स विभाग, नगररचना विभाग आणि शहर अभियंता विभागावर छापे घातले आहेत. गुरुवारी पहाटे तीन वाजेपर्यंत कागदपत्रांची तपासणी सुरू होती.

मुख्य लेखा व वित्त विभागापासून आयकरच्या पथकाने कागदपत्रे तपासण्यास सुरूवात केली होती. सुरूवातीला 10 लाखापर्यंत केलेल्या कामांच्या फाईली तपासल्या. मात्र नंतर 100 कोटींच्या वरील कामांच्या सर्व फायलींची तपासणी करण्यात आली. मंगळवारी  सकाळ पासून आज पहाटे पर्यंत तपास सुरू होता. महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना म्हणजे एचओडींना मेसेज पाठवून कुणीही घरी जाणार नाही. असा निरोप यावेळी देण्यात आल्याचे समजते. ज्या विभागात 100 कोटींची कामे झाले आहेत असे विभाग आणि काम करणारे  महापालिकेचे मोठे ठेकेदार आणि अधिकारी आयकर विभागाच्या रडारवर आहेत.

आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

७ बायकांचा ‘पोलीस दादला’ निलंबित
आई वडिलांच्या कुशीत झोपलेल्या बाळाचे फूटपाथवरून अपहरण
वर्ल्ड बँकेचा दिलासा; ७.३ टक्के GDPचा अंदाज
लालूंसाठी जेलमध्‍ये गेले, अटक; चौकशी सुरु