Fri, Jan 18, 2019 07:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विक्रोळीत नव्या पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन

विक्रोळीत नव्या पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन

Published On: Mar 03 2018 1:47AM | Last Updated: Mar 03 2018 1:04AMविक्रोळी : वार्ताहर

मुंबई पूर्व उपनगरातील नागरिकांसाठी विक्रोळीच्या कन्नमवार नगर येथे असलेल्या पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे. 01 मार्च रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, ईशान्य मुंबईचे खा. किरीट सोमय्या, महाराष्ट्र सर्कल मुख्य पोस्टमास्टर हरिश्चंद्र अग्रवाल व क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. या नव्या पासपोर्ट सेवा केंद्राचा ईशान्य मुंबईतील 42 लाख नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. 

मुंबई पूर्व उपनगरातील नागरिकांना आधी पासपोर्ट बनवण्यासाठी मालाड, अंधेरी अथवा वरळीला जावे लागत होते. नव्या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे मानखुर्दपासून कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड परिसरातील नागरिकांना फायदा होणार आहे. खा. किरीट सोमय्या, रावसाहेब दानवे यांनी मनोगत व्यक्‍त केले. डॉ. स्वाती कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 मार्चपासून या पासपोर्ट सेवा केंद्रात ऑनलाईन अर्ज भरलेल्या नागरिकांच्या मुलाखती व कागदपत्रांची पडताळणी करण्यास सुरुवात होणार आहे. याठिकाणी नवे पासपोर्ट, पासपोर्ट नूतनीकरण केले जाणार असून, तात्काळ वा  वैद्यकीय तात्काळतेबाबत इथे सेवा उपलब्ध नाही.