Tue, Apr 23, 2019 23:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › १९ हजार कोटी बँकांच्या खात्यात

१९ हजार कोटी बँकांच्या खात्यात

Published On: Dec 08 2017 1:40AM | Last Updated: Dec 08 2017 1:32AM

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी 

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी आतापर्यंत 41 लाख शेतकर्‍यांच्या खात्यांसाठी 19 हजार 537 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ही रक्कम बँकांनी तत्काळ शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करावी, असे 
निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. कर्जमाफीसाठी आलेल्या 77 लाख अजार्ंपैकी 69 लाख शेतकर्‍यांची खाती पात्र ठरविण्यात आली आहेत. लाभार्थी घटल्याने सरकारवरील कर्जमाफीचा बोजाही कमी होणार आहे. 

ऑनलाईन प्रक्रियेत एकूण 77 लाख शेतकरी खातेदारांचे अर्ज आले होते. पुन्हा पुन्हा आलेले अर्ज तसेच इतर त्रुटींमुळे 69 लाख खाती मान्य करण्यात आली आहेत. त्यापैकी सुमारे 41 लाख शेतकर्‍यांच्या खात्यासाठी 19 हजार 537 कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली आहे. यामध्ये वन टाईम सेटलमेंटसाठी 4 हजार 673 कोटी रुपये आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

पात्र शेतकर्‍यांची यादी बँकांना शाखानिहाय देण्यात आली आहे. बँकांनी ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात तत्काळ जमा करावी, त्यासाठी बँकांनी स्थानिक यंत्रणा सक्षम करावी, तसेच सर्व खातेदारांना रब्बीसाठी कर्ज देण्याचीही व्यवस्था करावी, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत ते बोलत होते.