पोलिसांचे कोरोना मीटर सुरुच; गेल्या २४ तासात ४७ पॉझिटिव्ह

Last Updated: Jun 03 2020 11:53AM
Responsive image


मुंबई : पुढारी ऑनलाईन

पोलिस दलातही कोरोना विषाणूचे संकट अधिक गडद होत चालले आहे. गेल्या २४ तासात ४७ पोलिस कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पोलिस दलातील बाधित कर्मचाऱ्यांच्या संख्येने अडीच हजाराचा टप्पा ओलांडला आहे. 

सर्व प्रकारच्या सुरक्षा बाळगूनही कोरोनाचा संसर्ग होण्याचे वाढते प्रमाण दिवसेंदिवस पोलिस प्रशासनाची चिंता वाढवत आहे. कालच्या आकडेवाडीनुसार, राज्य पोलिस दलातील ८ अधिकारी आणि ८५ अंमलदार अशा कोरोनासंबंधी कर्तव्य बजावत असलेल्या ९३ नव्या पोलिस कर्मचार्‍यांना कोरोना उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, यामध्ये गेल्या २४ तासात ४७ पोलिस कर्मचाऱ्यांची भर पडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार पोलिस दलातील बाधित पोलिस कर्मचाऱ्यांचा आकडा २ हजार ५५६ वर पोहचला आहे. तर कोरोना बाधीत पोलिस कर्मचाऱ्यांच्या मृतांचा आकडा २७ इतका आहे.