Sat, Nov 17, 2018 16:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  ‘कोरेगाव-भीमा’ची पाळेमुळे खणून काढू

 ‘कोरेगाव-भीमा’ची पाळेमुळे खणून काढू

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 07 2018 1:47AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खोदण्याचा निर्धार आहे. त्यासाठी सखोल चौकशी करण्यात येऊन त्यामध्ये दोषी आढळणार्‍यांवर निश्‍चितच कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन कोरेगाव-भीमा येथील प्रकरणांत दोषींवर कारवाई करण्यात यावी, महाराष्ट्र बंदच्या काळात निरपराधांवर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी कोणावरही आकसाने कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. वढू बुद्रुक परिसरातील घटनाक्रम आणि त्यानंतर घडलेल्या सर्व घटनांचा आढावा घेतला जात आहे.

राज्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वारंवार आढावा घेतला जात आहे. बंदच्या काळात परिस्थिती बिघडविणार्‍यांवर कारवाई होईलच. पण नाहक कुणावरही कारवाई होऊ नये, अशी काळजी घेतली जात आहे. नाहक नुकसान झालेल्यांनाही मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.