Thu, Apr 25, 2019 04:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सचिनच्या शाळेत महाराष्ट्राचे अभ्यासक्रम बंद

सचिनच्या शाळेत महाराष्ट्राचे अभ्यासक्रम बंद

Published On: Apr 25 2018 2:03AM | Last Updated: Apr 25 2018 2:03AMमुंबई : प्रतिनिधी

सचिन तेंडुलकरची शाळा म्हणून ओळखली जाणारी दादरची नामवंत शारदाश्रम विद्यामंदिरमध्ये राज्य शिक्षण मंडळाचा   अभ्यासक्रम बंद करून त्या ठिकाणी आयसीएसईच्या केंद्रीय मंडळाचा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. शाळेच्या या एकतर्फी निर्णयाने पालकांच्या भीतीचा पोटात गोळा आला आहे.

चौथीच्या विद्यार्थ्यांना पाचवीसाठी आयसीएसई बोर्डात प्रवेश घ्यावा यासाठी पालकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. राज्य मंडळाच्या इंग्रजी माध्यमात शिकत असलेले वर्ग अचानकपणे ते केंद्रीय बोर्डात समावेश करत अभ्यासक्रम बदलत असल्याने शाळेच्या या कारभाराबद्दल  पालकांनी जोरदार विरोध करीत विद्यार्थ्यांना आयसीएसईच्या अभ्यासक्रमात घालण्यास विरोध दर्शवला आहे. 

शाळेने कोणत्याही प्रकारे आम्हाला विश्वासात घेतले नाही. आधी पाचवीतून सहावीत जाणार्‍या विद्यार्थ्यांनाही अशी जबरदस्ती करण्यात आली, मात्र पालकांनी विरोध दर्शवला. ते प्रकरण थांबले. आता यंदाही शाळा सुरु होण्यापूर्वी असा निर्णय घेतला जात आहे. 

Tags : In Sachins school Maharashtra Stop practice order