Thu, Jan 24, 2019 18:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकल रेल्वेस्थानकांवरही इन-आऊट पॉईंट!

लोकल रेल्वेस्थानकांवरही इन-आऊट पॉईंट!

Published On: Mar 05 2018 1:50AM | Last Updated: Mar 05 2018 1:45AMमुंबई : प्रतिनिधी 

मेट्रोच्या स्थानकामध्ये ज्याप्रमाणे इन आणि आऊट एन्ट्री पॉईंट बसवण्यात आले आहेत, त्याप्रमाणे उपनगरीय रेल्वेस्थानकांमध्ये देखील इन आणि आऊट एन्ट्री पॉईंट बसवण्यात येणार आहे. 

उपनगरीय रेल्वेमार्गावरील रेल्वेस्थानकांमध्ये अनधिकृतपणे घुसणार्‍या प्रवाशांना आणि स्थानिकांना रोखण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे नवीन योजना आखण्यात येत आहे. मात्र हा प्रयोग लोकल स्थानकांवर किती यशस्वी होईल याबद्दल साशंकता आहे. सध्या वर्सोवा-अंधेरी मेट्रो स्थानकातील एन्ट्री पॉईंटमधून एका मिनिटाला 60 प्रवासी ये-जा करू शकतात. उपनगरीय रेल्वे मार्गावर दररोज 80 लाख प्रवासी प्रवास करतात. एका लोकलमधून सुमारे 8 ते 10 हजार प्रवासी ये-जा करतात.