Wed, Apr 24, 2019 22:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कमला मिल प्रकरणी तिन्‍ही आरोपी अटकेत

कमला मिल प्रकरणी तिन्‍ही आरोपी अटकेत

Published On: Jan 11 2018 7:36AM | Last Updated: Jan 11 2018 7:47AM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

कमला मिल आगप्रकरणी तिन्‍ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. वन अबाव्‍हचे मालक क्रिपेश आणि भाऊ जिगर संघवी यांना मुंबई पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली. तर त्यानंतर उशिरा त्यांचा सहकारी अभिजित मानकरलाही अटक करण्यात आली आहे. हे तिघे गत १२ दिवसांपासून फरार होते.

अतिरिक्त पोलिस आयुक्त एस. जयकुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. गेल्या १२ दिवसांपासून फरारी असलेल्या संघवी बंधूना अखेर अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांना आज कोर्टात हजर करणार असल्याचे जयकुमार यांनी सांगितले.

वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो पबला २८ डिसेंबरच्या मध्यरात्री भीषण आग लागून १४ जणांचा मृत्यू झाला, तर ४१ जण जखमी झाले. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात चार तर भायखळा पोलीस ठाण्यात एक असे एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही आग वन अबव्हमध्ये लागल्याच्या प्राथमिक तपासाअंती मालक क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांविरोधात पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.