Fri, Jul 03, 2020 02:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण डोंबिवलीत २४ तासांत २९ रुग्ण

कल्याण डोंबिवलीत २४ तासांत २९ रुग्ण

Last Updated: May 28 2020 7:54PM

संग्रहित छायाचित्रकल्याण : पुढारी वृत्तसेवा

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासांत सर्वाधिक २९ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये कल्याण पश्चिम परिसरातील एक कोरोना बाधित पुरुष रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २७ वर पोहोचला आहे. तर कोरोना बाधितांची संख्या ९११ वर पोहोचली आहे. काल (ता.२७) दिवसभरात ११ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आजमितीला २९७ रुग्णांनी डिस्चार्ज घेतला असून ५८७ रुग्ण उपचार घेत आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील बुधवारी सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये कल्याण पूर्वे कडील शिवाजी नगर येथील पुरुष कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल पालिकेला प्राप्त झाला. महापालिका क्षेत्रात कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या २७ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.

पालिका क्षेत्रात एकूण २९ रुग्ण सापडले आहेत. या मध्ये कल्याण पूर्व १२ कल्याण पश्चिम १, डोंबिवली पूर्व ११, डोंबिवली पश्चिम ३, आंबिवली-१, ठाकुर्ली-१ असे रुग्ण सापडले आहेत. महापालिका क्षेत्रातील एकूण रुग्णांची संख्या-९११ इतकी झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५८७  आहे तर  २८७ रुग्ण उपचार दरम्यान बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मयत रुग्णांची संख्या २७ आहे .डिस्चार्ज झाले असून ५८७ रुग्ण उपचार घेत आहेत.