Tue, Mar 26, 2019 11:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात स्पा सलूनमध्ये अनैतिक व्यवसाय

ठाण्यात स्पा सलूनमध्ये अनैतिक व्यवसाय

Published On: Dec 31 2017 2:07AM | Last Updated: Dec 31 2017 1:20AM

बुकमार्क करा
ठाणे : प्रतिनिधी

मसाजच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय करणार्‍या स्पा अ‍ॅण्ड सलूनचा भंडाफोड पोलिसांनी केला असून सात पीडित महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

ठाणे पश्‍चिमेकडील माजिवडा गावातील अरिहंत इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या दिवा हेल्थ स्पा अ‍ॅण्ड सलूनमध्ये मसाज करण्याच्या नावाखाली अनैतिक धंदे सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून या प्रकरणाची शहानिशा पोलिसांनी केली व त्यानंतर छापा मारून पैशाच्या मोबदल्यात शरीरविक्रय करणार्‍या सात पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच स्पा चालवणार्‍या विजय यादव (30) आणि बापूराव उर्फ दीपक जाधव यांच्याविरोधात कापुरबावडी पोलिसात गुन्हे दाखल करून यादव याला अटक करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक आर.आर.दौंडकर करीत आहेत.